जय गणेश संकुलाचे मा.ना.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Share This News

भाऊ रंगारी गणेश मंडळा जवळ असलेल्या “जय गणेश”संकुलाचे विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. या कार्यक्रम प्रसंगी धनम डेव्हलपर्सचे प्रवर्तक उपशहर प्रमुख आनंद गोयल, उद्योजक कृष्णकुमार गोयल, स्थायी समिति अध्यक्ष हेमंत रासने, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, डिवाय पाटील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एकनाथ खेडकर, बाळासाहेब भांडे, प्रशांत राणे, बुलढाणा बँकेचे रिजनल मॅनेजर योगिनी पोकळे, देशपांडे, आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना ना. नीलमताई गो-हे म्हणाल्या “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की मराठी माणसाने उद्योग व्यवसायात पुढे यावे. या प्रेरणेतून आनेक कार्यकर्ते समाजकारण व अर्थकारण एकत्र करतात म्हणजेच सामाजिक कार्य करीत असताना उद्योगात ही कार्य करतात.आनंद गोयल हे उद्योग करीत असताना ५० हजार नागरिकांना खिचडी वाटप, ऊद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त यांना नवप्रसूत महिलाना आवश्यक वस्तूंचे ५०० किट वाटप केले. यानंतर संभाजीनगर महापालिकेने असाच उपक्रम राबविला. याचा बर्याटच बालकांना फायदा झाला. अशीच योजना पुणे महानगर पालिकेने राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली व या संकुलाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या”. या प्रसंगी आनंद गोयल यांनी ना.नीलमताई यांच्या निर्देशानुसार ५०० नवप्रसूत मातांना आवश्यक किट मासाहेब मीनाताई ठाकरे सन्मान योजने अंतर्गत देणार असल्याचे जाहीर केले.
छायाचित्र :भूमिपूजन करताना नीलमताई गो-हे,आनंद गोयल कृष्णकुमार गोयल व अन्य