शारदीय नवरात्रोत्सव निमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा.ना. नीलमताई गो-हे यांच्या हस्ते सारसबाग येथील श्रीमहालक्ष्मी माता मंदिरात महाआरती करण्यात आली. या प्रसंगी नगरसेवक प्रविण चोरबोले, नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, डॉ.शैलेश गुजर, सूरज लोखंडे, अनंत घरत, महालक्ष्मी ट्रस्ट अध्यक्ष राजकुमार आगरवाल, भरत आगरवाल, अमिता आगरवाल, अमिता आगरवाल, तृप्ती आगरवाल, आदी मान्यवरांच्या बरोबरच भाविक उपस्थित होते. कोरोना संबंधी सर्व नियम पालन करण्यात आले. या प्रसंगी डॉ.नीलमताई गो-हे यांनी “महाराष्ट्रातील सर्वांना कोरोनाशी नियम पाळून लढण्याची बुद्धी दे,आणि विविध नैसर्गिक आपत्ती बरोबर लढण्याची शक्ति दे” अशी महालक्ष्मी चरणी प्रार्थना केली.
छायाचित्र : महाआरती करताना नीलमताई गो-हे व मान्यवर.