पुणे दि.०९ : नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे. दि.०८ ऑक्टोबर , २०२१ रोजी दुसऱ्या माळेच्या निमित्ताने महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती आणि तांबडे जोगेश्वरीचे दर्शन घेऊन जगातील कोरोनाचे संकट दूर होऊन सर्वांना उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. तसेच महिलांवरील अत्याचार कमी होऊन त्यांना उत्तम सुरक्षा मिळावी, शेतकऱ्यांवर आलेली नैसर्गिक आपत्ती संकटातून सावरण्याचे बळ शेतकऱ्यांना मिळो अशी प्रार्थना देखील डॉ.गोऱ्हे यांनी केली. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कोरोना प्रतिबंधित नियमाचे पालन करून दर्शन घेण्याचे आवाहन देखील डॉ.गोऱ्हे यांनी केले.
यावेळी पुणे पोलीस उपायुक्त श्रीम. प्रियांका नारनवरे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीम. जेहलम जोशी, शिवसेना शहर संघटक राजेंद्र शिंदे, अश्विनी शिंदे ह्या उपस्थित होत्या.