“सर्वांच्या मासाहेब असलेल्या स्व.मीनाताई बाळासाहेब ठाकरे म्हणजे करारीपणा, दृढनिश्चय,सामर्थ्य,सामंजसपणा,सुसंस्कृतता यांचा संगम होता.हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांनी एक लढवैया तरुणांची एक पिढी महाराष्ट्रात उभी केली.त्यामध्ये अर्थातच शिवसेना नेत्यांचे,अर्थातच मा.उद्धवजी ठाकरे यांचे मोठे योगदान आहे.इतर अनेक पक्षात महिलांवर अन्याय होतो असे त्या पक्षातील महिला नेत्या म्हणत असतात.मात्र जेव्हा अन्याय अत्याचार होतात तेव्हा शिवसेना महिला आघाडी धावून जाते,शिवसेना महिला आघाडीच्या कार्याची दखल घेत आगामी महापालिका व जिल्हापरिषद निवडणुकांत शिवसेना महिला आघाडी सक्षमपणे काम करेल.या कामाचे मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दखल घेत असतात.त्यामुळे विधानपरिषद अथवा राज्यसभा यातील महिलांचा कोटा पूर्ण भरला आहे,आगामी काळात ही महिला आघाडी असेच कार्य करेल व त्यांना योग्य ती संधी दिली जाईल ” असे प्रतिपादन स्व.मीनाताई ठाकरे यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिना निमित्त विधानपरिषद उपसभापती मा.ना निलमताई गो-हे यांनी केले.शिवसेना भवन पुणे येथे शिवसेना पुणेशहर व जिल्हा यांच्यावतीने मासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण प्रसंगी त्या बोलत होत्या.या कार्यक्रम प्रसंगी शहरप्रमुख गजानन थरकुडे,संजय मोरे,सहसंपर्क संघटिका किर्तिताई फाटक,मुळशीभोर वेल्हाचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे,ज्येष्ठ कार्यकर्त्या निर्मलाताई केंडे, सविता मते,संगीता ठोसर,स्वाती ढमाले,कल्पना थोरवे,सुदर्शना त्रिगुणाईत,स्वाती कथलकर,पद्मा सोरटे,राजू विटकर,संजय वाल्हेकर आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
छायाचित्र :आदरांजली वाहताना ना.नीलमताई गो-हे व अन्य मान्यवर.