राखी पोर्णिमेनिमित्त भारतीय कामगार सेनेचे सचिव रघुनाथ कुचीक यांना राखी बांधली या प्रसंगी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी त्यांनी बोलताना “ श्री कृष्ण भगवान यांचे बोट कापले असताना द्रोपदीने पदर फाडून बोटाला बांधले– रक्षण केले.म्हणून द्रोपदीचे बंधु शोभे नारायण असे म्हणतात. तसेच पुरुषांनी महिलांचे रक्षण करावे तसेच आता महिला सुद्धा पोलिस फोर्स,सैन्यदल,व नुकतेच एनडीए व विविध सुरक्षा मध्ये सामील होवून सामान्य नागरिकांचे,महिलांचे,छोट्या मुलांचे रक्षण करीत आहेत.आणि आपल्या सगळ्यांचे रक्षण जवान जवान करत असतात.आपण सगळे कोरोना संकटाच्या धाग्यात गुरफटलो होतो.यावर मात करण्यासाठी सुटण्यासाठी पक्षी जसे जाळ्यासकट उडतात तसे आपण सगळ्यांनी कोरोंनाचे नियम पाळून मुक्त होत चाललो आहोत. श्री गणेश व श्री कृष्ण चरणी या सर्वांना यश मिळो,चांगली बुद्धी मिळो सर्व सण सामाजिक अंतर पळून यशस्वी होवोत अशी प्रार्थना करते. श्री रघुनाथ कुचीक अनेक वर्ष भारतीय कामगार सेनेत कार्य करीत आहेत यात महिलांसाठी ही ते कार्य करीत आहेत. आज आनंदाची बाब म्हणजे स्त्री आधार केंद्राच्या वतीने महिला कामगार मग त्या संघटित असो की असंघटित त्यांच्या साठी ५०० महिलांसाठी लसीकरणाची शिबीर आम्ही जाहीर करीत आहोत.पुढच्या आठवड्या पासून तो कार्यक्रम सुरू होईल.मुंबई,पुणे आणि संभाजी नगर येथे ही शिबिरे होतील.त्याच बरोबर “ स्वयंसिद्धा”भाग २ या स्त्री आधार केंद्राच्या कामाची मी घोषणा करत आहे यामध्ये कोरोना मध्ये निराधार झालेल्या ज्या महिला आहेत त्यांना नक्की काय प्रकारची मदत अपेक्षित आहे याबाबत धोरणात्मक सूचना देण्यासाठी सर्वक्षण करत आहोत या कार्यात आमच्या सोबत अपर्णा पाठक व जेहलम जोशी,या समन्वयक आहेत फरीदा लांबे,मेधा कुलकर्णी,मृणालिनी जोग व अनेक महिला या कामात प्रत्यक्ष मदत करत आहेत आणि अनीता फडतरे, आश्लेषा शिंदे आणि समाज स्वास्थ्याचे जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये अमरावती,औरंगाबाद सोलापूर या सगळ्यांचा या कामात सहभाग आहे.हा रिसर्च जनार्थ संस्थेच्या मदतीतून पुढच्या दोन महिन्यात केला जाणार आहे असे जाहीर केले.
छायाचित्र :ना.नीलमताई गो-हे या रघुनाथ कुचीक यांना रक्षाबंधन करताना.