“ पुणे महानगर पालिकेत शिवसेना नगरसेवकांचा असा आकडा हवा की आपण म्हणू तोच महापौर. राष्ट्रवादीचे वरिष्ठनेते अजितदादा पवार, शरद पवार यांच्याशी युतीची चर्चा करू झाली तर ठिक नाही तर “एकला चलो रे” असे स्वबळावर लढू, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मभूमी पुणे व मुंबई नंतर सर्वात जास्त वेळ ते पुण्यात असत. आता स्थिती बदलली आहे. मा.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत, अनेक नवे कार्यकर्ते सेनेत येत आहेत अशा वेळी पुणे मनपामध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्याची वेळ आली आहे”. असे खा.संजय राऊत यांनी केले. तसेच चंद्र्कांतदादा पाटील व अन्य लोकांकडे आपण लक्ष देत नाही त्यांना सव्वा रुपया किमत देतो. सरकार मजबूत आहे .अजित दादांनी सकाळची घेतलेली शपथ विसरावी आसा सल्ला दिला. या प्रसंगी बोलताना विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गो-हे म्हणल्या “मा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून त्यांचे आभार, तसेच महिलांच्या कर्तुत्वाला ओळखून संधी देणारे मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे विधानपरिषद उपसभापती पदाचा मान मिळाला, याबद्दल त्यांचे आभार, पुण्यातील टेकड्या शिवसेनेमुळे वाचल्या आहेत. तसेच सोशल मीडियाने उद्धव ठाकरे घराघरात पोचले आहेत. अशा तटस्थ मतदारांना शिवसेनेकडे आणले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात संपर्क प्रमुख सचिन अहिर, विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, यांनी विविध विषयांवर सखोल व जोशपूर्ण मार्गदर्शन केले. वाडगाव शेरी येथील विठ्ठलांजन कार्यालय येथे झालेल्या या आढावा बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, मा.आ.महादेव बाबर, चंद्र्कांत मोकाटे, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, सचिन भगत, आबा खलसे, सुनील जाधव, राजाभाऊ चौधरी,शंकर संगम,पाला मोरे आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सर्वांचे स्वागत वाडगावशेरी मतदार संघाच्या वतीने उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी केले. सूत्र संचालन सागर माळकर यांनी केले. आभार प्रदर्शन सतीश मुळीक यांनी केले.