स्वार्थत्याग भूमिकेतूनही अहिल्याबाई जरांडे यांनी काम केलं -ना.डॅा.नीलम गोऱ्हे.*

Share This News

ज्येष्ठ शिवसैनिक अहिल्याताई निवृत्ती जरांडे यांच नुकतच दुःखद निधन झालं. शिवसेनेच्या प्रवक्त्या उपनेत्या आणि उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अहिल्याताई जरांडे यांचे कुटुंबीय चिरंजीव श्री कैलास निवृत्ती जरांडे आणि सुनबाई सौ लीलाताई कैलास जरांडे यांच्याशी संवाद साधला आणि बर्‍याच आठवणी त्या निमित्ताने विचारपूस केली अहिल्याताई यांच्या अल्पशा आजाराने निधन झालं. परंतु त्यांची स्मृती त्याचबरोबर बोलण्याची शक्ती ही चांगली होती, आणि त्या चळवळीत काम केलेल्या बर्‍याच जणांच्या आठवणी सांगायच्या अस त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितल होतं आणि आजही त्यांच्या मनामध्ये हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री नामदार उद्धव साहेब ठाकरे यांच्या संदर्भांमध्ये आणि पुण्यातल्या जुन्या शिवसैनिकांबरोबर च्या केलेल्या कामाची आठवणी सदैव जागृत असायच्या असं जरांडे यांच्या नातलगांनी नीलमताई  गोऱ्हे यांना सांगितल त्यावर नीलम गोऱ्हे यांनी अहिल्याबाई जरांडे यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिक महिलांच्या त्यागावर आजची शिवसेना उभी राहिलेली आहे आणि या योगदाना मध्ये पूर्ण शहरातल्या अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांचा आणि विद्यमान शिवसैनिकांचे  योगदान आहे ज्यात सेवा  आणि स्वार्थत्याग भूमिकेतूनही अहिल्याताई जरांडे यांनी काम केलं त्या एका अर्थाने मासाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्श मानून काम करणाऱ्या शिवसैनिक होत्या एका बाजूला ममता, तर दुसऱ्या बाजूला वेळ पडली तर दुर्गेच रौद्ररूप धारण करण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये शक्ती होती. आणि त्याच्यामुळे त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा दरारा पुण्याच्या शिवसेनेमध्ये होता. त्याच्या बद्दल नीलमताई  गोऱ्हे यांनी खास अशी त्यांची आठवण व्यक्त केली.आणि
त्यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण अशी श्रद्धांजली व्यक्त केलेली आहे, त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर देवो अशी प्रार्थना त्यांनी नमूद केली. !!!

*आपली,*
*ना.डॅा.नीलम गोऱ्हे,*