कोरोना महामारीच्या काळात कार्यक्रम,लग्न आदी वर अनेक बंधने आली.त्यामुळे बँड पथकातील सर्वांचे रोजगार बुडाले.या पार्श्वभूमीवर मा.ना.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते सुमारे २६० गरजू कलाकारांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. स्त्री आधार केन्द्र्पुणे,प्रथम संस्था मुंबई आणि उपसभापती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले.दरबार ब्रास बँडचे इकबाल दरबार,प्रभात बँडचे अमोद सोलापूरकर,बँड कलाकार संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव,गणपत भारस्कर व अन्य कलाकारांचा यात समावेश होता.त्यांनी गो-हे यांना लग्न समारंभातील संखेत बँड पथकातील लोकांना धरू नये अशा मागणीचे निवेदन दिले.या प्रसंगी बोलताना नीलम गो-हे यांनी मा. मुख्यमंत्री अशा बाबतीत वैद्यकीय तज्ञ- डॉक्टर्स यांचे मत विचारात घेवून निर्णय घेतात असे संगितले.कोरोना काळात रिक्शा ड्रायव्हर व अन्य यांना मदत मिळाली तसेच घरकामगार,विषयी प्रयत्न व नोंदणीचे प्रयत्न सुरू आहेत.सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे म्हणजे पुढील संभावित लाट थोपविता येईल असे संगितले. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना पुणेशहर प्रमुख संजय मोरे,व गजानन थरकुदडे,सहसंपर्क प्रमुख प्रशांत बढे,विजय देशमुख.संवाद पुणेचे सुनील महाजन निकिता मोघे,शिवसेना महिला आघाडीच्या कल्पना थोरवे,सुदर्शना त्रिगुणाईत तसेच महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.उद्या सनई व नगारा वादकांना अशीच किट वाटप करण्यात येणार आहे.
छायाचित्र :ईकबाल दरबार यांना किट प्रदान करताना नीलम गो-हे व अन्य मान्यवर.