आषाढी व कार्तिकी हे महाराष्ट्राच्या समाज जीवनाचे अभिन्न अंग आसून शेकडो वर्ष पंढरीच्या वारीचे लाखो वारकरी व नागरिक या आनंद सोहळ्यात सहभागी होतात.मात्र कोरोना महामारी मुळे मोजक्याच भक्तांच्या सहभागाने हा सोहळा तितक्याच उत्साहाने संपन्न होत आहे. आज संतशिरोमणि श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत आहे.या निमित्त विधानपरिषद उपसभापती मा.ना.डॉ.नीलमताई गो-हे यांनी आळंदी येथील संजीवनी समाधीस पुष्पहार अर्पण केला.तसेच महाराष्ट्र व देशातील कोरोना नष्ट व्हावा.सामान्य जनजीवन व वारी पुन्हा पूर्वीच्याच दिमाखाने साजरी व्हावी असे मागणे केले.महाराष्ट्रातील तमाम जनता,अगदी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवार हा देखील विठ्ठल भक्त आहे.वारकरी तर सर्वांमध्ये विठ्ठल पाहतात असे संगितले.तसेच अन्नदाना साठी देणगी दिली.या प्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे सीईओ अंकुश जाधव, आळंदी देवस्थान ट्रस्टचे अभय टिळक,योगेश देसाई,सोहळा प्रमुख विकास ढगे,माजी जिल्हा प्रमुख राम गावडे,नगरसेविका शैला अविनाश तापकिर,शहरप्रमुख अविनाश तापकिर,विजयताई शिंदे,मंगलताई सोनवणे,उपशहर प्रमुख आनंद गोयल,पोलिस निरीक्षक मोहन यादव,उपनिरीक्षक श्री जोंधळे,तम्मा विटकर,युवराज शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र :माऊलींच्या संजीवन समाधीस प्रणाम करताना नीलमताई गो-हे