*ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या मातोश्री लतिका गोऱ्हे यांच्या समवेत आज घेतली कोव्हिडं-१९ लस*

Share This News
  • पुणे दि. ११ : कोव्हिडं-१९ चा प्रतिकार करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने जेष्ठ नागरिकांना १ मार्च पासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आज दि.११ मार्च २१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या मातोश्री लतिका गोऱ्हे यांच्या समवेत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे जाऊन कोव्हिडं-१९ ची लस घेतली. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ.सागर बेळकीहाड यांच्या दखरेखीनुसार परिचारीका कदम व परिचारीका शिल्पा यांनी लस दिली.कोविड व्यवस्थापन डॉ. माधव भट व व्यवस्थापक श्री.सचिन व्यवहारे, यांनी योग्य मार्गदर्शन करुन चोख व्यवस्था ठेवली होती. याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले असून सर्व जेष्ठ नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन केले आहे.यावेळी किरण साळी ,शिवसेना पदाधिकारीही हजर होते.