*पुणे मनपा आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांच्यावर नगरसेवक धनराज घोगरे यांनी केलेल्या मानहानीकारक वागणुकीची चौकशी मनपा आयुक्त यांना करण्याची विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची सूचना…*

Share This News

पुणे दि.२९: पुणे मनपा आरोग्य अधिकाऱ्यांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा ताण पडत आहे. असे असताना देखील  पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉक्टर भारती यांच्या दालनांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी जाऊन  संतप्तपणाने जाऊन बरच वादंग केला.  त्याचवेळी ते डॉ वैशाली जाधव यांच्या अंगावर धावून गेले.  त्याचा परिणाम म्हणजे अशा मानहानीकारक वर्तनामुळे, अपमानामुळे डॉ.जाधव ह्या भाविववश झाल्या. याबाबत डॉ.जाधव यांनी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे सदरील घटनेची माहिती दिली. यात एका बाजूला हॉस्पिटलमधील लसीकरण, कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या या सगळ्यामुळे मोठ्याप्रमाणात कामाचा बोजा आरोग्य यंत्रणेवर आलेला आहे. श्री .घोगरे यांच्या वेगळ्या काही मागण्या  असतील किंवा एखादे काम झाले नसेल तर कशा प्रकाराने बोलायचे याची आचारसंहिता, शिस्त, नियमावली, माणुसकी पाळणे आवश्यक होते पण श्री घोगरे यांच्या वर्तनामुळे कायद्याला मत हरताळ फासला गेलेला आहे असे ना.डॉ.गोऱ्हे  यांनी व्यक्त केले आहे.

*पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री विक्रम कुमार आणि पुण्यामधले सर्व लोकप्रतिनिधींना या सर्वांची जबाबदारी आहे की, सुरक्षित आणि निर्भय वातावरणामध्ये  महिला कर्मचारी, महिला  डाॅक्टर , आरोग्य कर्मचारी  यांना काम करता आले पाहिजे*. या दृष्टिकोनातून घोगरे यांच्या कडून वर्तन झाले त्याबद्दल ना.डॉ.गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे व  चौकशी समिती नेमण्याची सूचना मनपा आयुक्त यांना केली आहे. तसेच डॉ जाधव यांची व आरोग्य कर्मचाऱ्यांची श्री घोगरे यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असे ना.डॉ.गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.  याबद्दलच्या चौकशी समितीचा अहवाल  नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याचे निर्देश देखील दिले आहेत. जेणेकरून श्री घोगर्रे यांच्या वर्तनाच्या संदर्भात राज्य शासन कारवाई करायची याबद्दल विचार करू शकेल असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर पुणे महापालिकेतील  सगळ्या नगरसेवकांनी डॉ जाधव यांच्या प्रकरणात बघाची भूमिका न घेता आणि श्री घोगरे यांचे समर्थन न होता आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची आवाहन डॉ.गोऱ्हे यांनी केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व ऊपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार, नगर विकास रो मंत्री ना. एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री ना.श्री. राजेश टोपे या सर्वांकडे यासंदर्भातील माहिती व निवेदन ना.डॉ.गोऱ्हे यांनी कळविले आहे.