प्राणवायु निर्माण व वितरणासाठी शासन प्राणपणाने प्रयत्नशील आहे, दिरंगाईचा अपप्रचार जनतेचे खच्चीकरण करण्यासाठी !शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे .*

Share This News

मुंबई / पुन दि.२६:    राज्यात कोरोना रोगाचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे अत्यवस्थ रुग्णाना ऑक्सीजनची मोठया प्रमाणात गरज भासत आहे. महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय कारणासाठीचा ऑक्सीजन वगळता उद्योग क्षेत्रासाठीचा ऑक्सीजन मोठ्या प्रमाणावर तयार होतो. तसेच काही रुग्णालयात स्वत:ची ऑक्सीजन निर्मितीची यंत्रेही बसविण्यात आलेली आहेत.
राज्याला केंद्र शासनाकडून 10 ठिकाणी ऑक्सीजन संयंत्रे देण्यात आले. जिल्हा रुग्णालय, वाशिम, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे 200 पी.स.ए. क्षमता, जिल्हा रुग्णालय, सातारा, रायगड, उस्मानाबाद येथे 300 पी.एस.ए. क्षमता, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर व बुलढाणा येथे 400 पी.एस.ए. क्षमता, जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे 500 पी.एस.ए. क्षमतेचे संयंत्रे मंजूर आहेत. *ही सर्व यंत्रे उभारणीच्या स्थितीत आहेत. तर सिधुदुर्ग येथील यंत्रे लवकर पोहचत आहेत. ती सर्व संयंत्रे केंद्र शासनाने पुरविलेली आहेत. यासाठी राज्यशासनाला अद्यापही निधी पुरविण्यात आलेला नाही.*

*संयंत्रे पुरविण्याचे आदेश केंद्र शासनाने दिलेले असून उभारणीची व कालबध्द यंत्रे सुरु करण्याची जबाबदारी केंद्र शासनाची आहे.*
ही सर्व यंत्रे दिनांक 5 एप्रिल, 2021  नंतर पुरविण्यात येत आहेत. या उभारणीच्य कामामध्ये राज्यशासनाने स्थानिक पातळीवर सर्व प्रकारचे सहकार्य देण्यात आले असून राज्य शासनाच्या पातळीवर कोणताही उशीर झालेला नाही.
*बृहन्मुंबई महानगरपालिकेने 90 कोटी रुपये खर्च करुन 12 रुग्णालयामध्ये 16 ऑक्सीजन निर्मिती यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून प्रती दिन 43 मॅट्रीन टन एवढा ऑक्सीजन उपलब्ध होणार आहे. जम्बो सिलेंडर तुलनेत अर्ध्या किंमतीत सदर ऑक्सीजन उपलब्ध होणार आहे.
● कस्तुरबा रुग्णालय येथे प्रति दिवस 500 घनमीटर क्षमतेचा ऑक्सीजन निर्मिती प्लांट सुरु करण्यात आलेला आहे.
● जोगेश्वरी येथील हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्राँमा केअर सेंटर मध्ये वर्षभरापासून प्रतिदिन 1740 घनमीटर क्षमतेचा ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 12 ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प वर्क ऑर्डर दिल्यापासून एका महिन्याच्या आत कार्यरत करण्यात येणार आहेत.
कोविड-19 या साथीमध्ये ऑक्सीजन पुरविण्याचे महत्व अनन्य साधारण आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाकडून कोविड रुग्णसंख्येनुसार सर्व राज्यांना ऑक्सीजन सम न्यायाची वाटप करणे आवश्यक आहे. सदरची परिस्थिती विविध अधिकारी, सामाजिक संस्था, पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर  निदर्शनास आली आहे
सद्य परिस्थिती मधे केंद्र व राज्य शासनाची आँक्सीजन एक्सप्रेस, राज्य सरकारचे ग्रिन काँरिडाँर , उद्योजकांनी प्रसंगी व्यापार ऊत्पादन बाजुला ठेवून आँकसीजन वैद्यकीय वापरासाठी देणे, विविध इस्पितळात निर्मिती संयंत्रे बसविणे हे सर्व अत्यंत उत्कृष्ट प्रयत्न वेगाने चालु  असून, या सर्व प्रयत्नाना मदत करण्याचे आवाहन शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोर्हे यांनी केले आहे.
राज्यसरकार प्राणवायुसाठी प्राणपणाने प्रयत्नशील आहे.
मा.शरदराव पवार यांनी साखर कारखान्यांना प्राणवायु निर्मितीच्या सामग्रीच्या सुचना दिल्या आहेत .
या  रुग्णसेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या सर्व तंत्रन्य व कोविड योध्दयांप्रती ऋण व्यक्त केले आहे.