पुणे दि. २५ : कोव्हिडं-१९ चा प्रतिकार करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने नागरिकांना १ मार्च पासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आज दि. २५ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे महानगर पालिकेचा कमला नेहरू रूग्णालय, पुणे येथे जाऊन कोव्हिडं-१९ ची २ रा डोज लस घेतली. पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती रूबल अग्रवाल सहकार्य केले याबद्दलच्या सुचना देण्यात आल्या.
कमला नेहरू रूग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.लता त्रिंबके देखरेखीनुसार परिचारीका वंदना चक्रनारायण यांनी लस दिली.कोविड लसीकरण पुणें शहर प्रमुख व्यवस्थापक डॉ. सुर्यकांत देवकर व डॅा. जयश्री पाटील, यांनी योग्य मार्गदर्शन करुन चोख व्यवस्था ठेवली होती. साधन सामुग्री कामाबद्दल पुढच्या काळात सहकार्य करणार आहे असे डॉ.गोऱ्हे यांनी म्हटले तसेच लसीकरणाची एकूण व्यवस्था हॉस्पिटल प्रशासनाचे व महानगर पालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त श्रीमती. रूबल अग्रवाल यांचे आभार मानले असून सर्व जेष्ठ नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन केले आहे.यावेळी पल्लवी जावळे नगरसेविका, शेखर जावळे शिवसेना पदाधिकारीही हजर होते.है