श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज मठाची जागा कोव्हिडं सेंटरसाठी अधिग्रहित करण्यात येणार नाही… उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रयत्नांना यशगोंदवलेकर महाराज मठाच्या वतीने ना.डॉ.गोऱ्हे यांचे मानले आभार

Share This News

पुणे/सातारा दि.२३: सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने श्री गोंदवलेकर महाराजांचा मठ अधिग्रहित करण्याबाबत माण-खटाव स्थानिक प्रशासनाने आदेश काढले होते. यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज देवस्थान ट्रस्ट येथील रुग्णालय तसेच भक्त निवासस्थान, भोजन व्यवस्थेसह कोरोना सेंटर स्थापन करण्याचा आदेश अधिग्रहित करणेत आले होते. परंतु सदरील मठ दाट वस्तीत असून याठिकाणी वयस्कर भाविक राहतात त्यांना ब्लड शुगर, बी.पी. या सारखे आजार देखील तेथे राहणाऱ्या भाविकांना आहेत. तसेच हे भाविक उपासना, सेवेसाठी विविध ठिकाणांहून आलेले आहेत. त्याबरोबर तिथे गावाच्या बाहेरच्या बाजूला मंगल कार्यालय तसेच शासनाचे हॉस्टेल ही आहे. या हॉस्टेल मध्ये आवश्यक असणारी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे देवस्थान यांच्याकडून विनंती पत्र देऊन हा आदेश रद्द करण्यासाठी विनंती केली होती. यानंतर ना.डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री ना.श्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.श्री अजितदादा पवार, महसूलमंत्री ना.श्री बाळासाहेब थोरात, पुणे विभागीय आयुक्त श्री सौरभ राव यांच्याकडे पत्र देऊन सदरील मठावर स्थानिक प्रशासनांकडून सुरू असलेली जुलूमशाही रद्द करण्याची सूचना केली होती.

याच दरम्यान ना.डॉ.गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्त श्री सौरभ राव यांना दूरध्वनीवरून संपर्क करून सदरील गोंदवलेकर महाराजच्या मठाबाबतचा आदेश रद्द करण्याची सूचना केली. यास सकारात्मक प्रतिसाद देत सदरील आदेश रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांना या संबंधी आदेश दिला होता. त्यानुसार आज माण-खटाव उपविभागीय अधिकारी यांनी दुरुस्ती आदेश काढत मौजे-गोंदवले बु, ता.माण, जि सातारा येथील मंदिर व उपासना हॉल वगळून श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज देवस्थान ट्रस्ट गोंदवले बु. यांचे फक्त रुग्णालय कोरोना केअर सेंटर स्थापन करणे बाबत अधिग्रहित आदेश काढले आहेत. या आदेशबद्दल ना.डॉ.गोऱ्हे आणि प्रशासन यांचे देवस्थानच्या आभार मानले आहेत. सदरील सुधारित आदेशाबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांचे आभार मानले.

यादरम्यान ना.डॉ.गोऱ्हे यांनी गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क करून मठाला सहकार्य करण्याची विनंती केली होती.