मुंबई/पुणे दि.१८ : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री ना.श्री अजितदादा पवार यांनी पावले उचलली आहेत. त्याबद्दल दोघांचे ही विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आभार मानले.
◆ ना.श्री अजितदादा पवार यांनी स्थानिक आमदार निधीत वाढ करून त्यातील १ कोटी निधी कोव्हिडं-१९ च्या उपाययोजना करण्यासाठी निधी खर्च करण्याच्या निर्णयामुळे स्थानिक आमदारांना ऑक्सिजन, बेड तसेच इतर साहित्य शासकीय हॉस्पिटलांना उपलब्ध करून देताना खूप मदत होणार आहे. याचा संपूर्ण फायदा कोरोनाच्या रुग्णांना होणार आहे याबद्दल ना.डॉ.गोऱ्हे यांनी शासनाचे आभार मानले.
◆ कोव्हिडं-१९ साठी शासन निर्णयानुसार विविध उपाययोजना साठी निधी खर्च करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. परंतु सदरील निर्णयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ज्या शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट ची अत्यावश्यक आहे तेथे निधी खर्च करण्याची अनुमती दिली तर ना.डॉ.गोऱ्हे सदरील निधी त्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्यांतील रूग्णालयासाठी उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठी विशेष बाब म्हणून २५ लक्ष रु निधी मंजूर करून देण्याची विनंती देखील डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे.
◆ ज्या कुटुंबाकडे रेशनकार्ड नाही परंतु ते आपले पोट भरण्यासाठी स्वतःच्या जिल्ह्यातून कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यात गेले आहेत. अशा कुटुंबासाठी मागील वर्षीच्या कोव्हिडं-१९ च्या पार्श्वभूमीवर *पुणे व बीड जिल्हापरिषद यांनी जशा प्रकारे जिल्हा बँकेतील ठेवींचे व्याज व सीएसआरच्या माध्यमातून ज्या कुटुंबाकडे रेशनकार्ड नाही अशा कुटुंबांनाही धान्य उपलब्ध करून दिले होते*. अशा योजना राबविण्यात येताना राज्यातील इतर शहरातील गरीबांना व इतर जिल्ह्यातही गरजेच्या आहेत . त्यासाठी योग्य लाभार्थ्यांना ओळखण्याचे काम ग्रामीण भागांत ग्रामपंचायतींना दिले होते .त्यामुळे अशा कुटुंबांना मदत करण्यास इतर जिल्ह्यांना व शहरी तसेच नगरपालिका क्षेत्रातही उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावा. शिवभोजन बरोबर याचा देखील फायदा नागरिकांना नक्कीच होईल अशी आशा आहे असे मत देखील ना.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.
◆ घरेलू कामगारांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. यात फेरनोंदणी न झालेले कामगार मोठ्याप्रमाणात आहेत. त्यामुळे फेरनोंदणी न झालेल्या ४ लाख ५० हजार घरेलू कामगारांना देखील आर्थिक मदत मिळण्याचे आश्वासन कामगार मंत्री श्री मुश्रीफ यांनी दिले आहे तरी देखील आपण स्वतः लक्ष घालून या घरेलू कामगारांना आर्थिक मदत देण्याबाबत प्रयत्न करावा.
तसेच
◆ रोहयोच्या अंतर्गत जे बांधकाम विभागाचे कामगार मजुर झाडे लावण्याचे काम करत नाहीत, अशा कामगारांचा समावेश बांधकाम कामगार मंडळ अंतर्गत बांधकाम कामगार म्हणून करण्यात आल्याचे मला अधिकाऱ्यांने सांगितले. रोजगार हमी योजने मधील रोजगारांना त्याचा थेट लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची बांधकाम कामगार म्हणून किती ठिकाणी नोंदणी झालेली आहे आणि त्यानुसार त्या त्या जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांप्रमाणे त्यांना देखील आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने आपण स्वतः देखरेख करावी अशी विनंती देखील ना.डॉ.गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्याकडे केली आहे.
सदरील मागण्याच्या विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य आदेश निर्गमित करण्याबाबग ना.डॉ.गोऱ्हे यांनी विनंती केली आहे.