पुणे/मुंबई दि.०४ : आज मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्रिमंडळाने कामगारांच्या प्रश्नाबाबत अनेक योग्य निर्णय घेतले. उद्योजकांना आवाहन करताना कंत्राटी कामगारांचीही आठवण मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांनी ठेवल्याबद्दल ना.डॉ गोऱ्हे यांनी यांचे आभार मानले. कामगारांच्या सुविधा व सुरक्षेची काळजी नक्कीच सरकारला आहे याची जाणीव सर्वांना करून दिली आहे. त्याबरोबर उद्योजकांच्या समस्या ही मुख्यमंत्री उद्धवजी यांनी ऐकल्या आहेत. यात राजघर्म व मानवी अधिकारांचे कर्तव्य मुख्यमंत्री यांनी उत्तम निभावले आहे. तसेच सामान्यांच्या भावना समज़ुन घेतल्याबद्दल ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले.
यापूर्वी वाढत्या कोरोना रुग्ण संख्यामुळे असंघटित कामगार पुन्हा आपल्या मूळ गावी परत जाण्याच्या विचारात असल्याबाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वेळोवेळी संबंधित मंत्री व विभागासोबत बैठक घेतल्या होत्या. यात
◆ रेशन कार्ड वर सध्या वाटत होणारे प्रत्येक कुटुंबास ३५ किलो धान्य हे तात्काळ उचलायला सांगणे व गत वर्षी प्रमाणे मोफत धान्य ही वाटप करणे आवश्यक आहे. यामुळे गरीब,मजूर व असंघटित कामगारांना नक्कीच मदत मिळेल.
◆ तसेच कामगारांचे मालक यांनीही या मजुरांना आर्थिक मदत करणेसाठी कामगार विभागाने व उद्योग विभागाने आवश्यक निर्देश देणे बाबत कार्यवाही करावी.
◆ स्थलांतरित मजुरांचे बरोबरच स्थायी कामगार यांच्यासाठी ही उपाय योजना केलेस या सर्व असंघटित मजुरांना दिलासा मिळेल.
अशा मागण्या वेळोवेळी ना.डॉ.गोऱ्हे यांनी लेखी निवेदनाने मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांचेकडे केल्या होत्या