*श्री मुकुंद भवन ट्रस्ट पुणे यांचेमार्फत कोविड१९ च्या अनुषंगाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाखांची मदत* *ट्रस्ट चे काम प्रेरणादायी व सामाजिक भावना जागृत असल्याबाबत गौरवोद्गार- डॉ नीलम गोऱ्हे.*

Share This News

31 Mar 2021पुणे: ३१ मार्च २०२१- पुणे शहरातील नामांकित श्री मुकुंद भवन ट्रस्ट ने गेल्यावर्षी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर रु ५ कोटी खर्च केले होते. या वर्षी आज वर्षा अखेरीस रु ५० लाख रुपयांचा धनादेश ट्रस्टी श्री पुरुषोत्तम लोहिया यांनी मा डॉ नीलम गोऱ्हे (उपसभापती विधान परिषद) यांचे हस्ते जिल्हाधिकारी पुणे यांचे प्रतिनिधी संतोष देशमुख यांचेकडे सुपूर्द केला. त्यावेळी डॉ गोऱ्हे यांनी या ट्रस्ट मार्फत करत असलेल्या कामाचे कौतुक केले. या ट्रस्ट चे काम हे माणुसकी सुदृढ करण्यासाठी आहे हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे असे ही डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. यासाठी डॉ शैलेश गुजर सहजीवन ट्रस्ट यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल डॉ गुजरांचे ही कौतुक डॉ गोऱ्हे यांनी केले. यावेळी पुरुषोत्तम लोहिया,आदित्य लोहिया, मदन जैन, परिवर्तन संस्थेचे डॉ शैलेश गुजर, डॉ प्रीतम शहा हजर होते.