पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील नवनाथ फडतरे यांची जे.एन.यु अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठ ,दिल्ली येथे ‘मास्टर आॅफ फिलाॅसाॅफी इन चायनीज स्टडीज’ या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.नुकतेच प्रवेश परिक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.भारतातील नामांकित असणार्या विद्यापीठात निवड झाल्यामुळे नवनाथ यांचे सर्वञ अभिनंदन केले जात आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील नवनाथ यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण गावातील मंदिरात भरणार्या वर्गांमध्ये बसुन पुर्ण केले.मंदिरांमध्ये आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण ते देशाची राजधानी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये निवड हा प्रवास सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
इंडियन इंट्यिट्युट आॅफ टेक्नोलाॅजी अर्थात (आय.आय.टी ) ,गुवाहाटी, आसाम राज्य येथे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असतानाच नेट परिक्षेत यश प्राप्त केले.फडतरे यांनी साविञीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या वृत्तपञ आणि संज्ञापन विभागामधून पञकारितेचे शिक्षण पुर्ण केले आहे. बंधू दत्ताञय हे पदव्युत्तर
पदवी शिक्षण पुर्ण केले असुन श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय,
शिवाजीनगर येथुन वकीलीचे शिक्षण घेत आहेत ,ते पी.एम.पी.एम.एल प्रवाशी मंचाचे सक्रीय सदस्य आहेत.वडील निवृत्त सैनिक आहेत तर आई गृहिणी आहे , त्यांना बंधु राकेश यांचे सहकार्य मिळाले.नवनाथ यांना परदेशात जाउन पी.एच.डी करण्याचा मानस आहे.
- आईची शिक्षणाची असणारी तळमळ, घेत असलेले कष्ट आणि वडीलांचा पाठींबा यामुळे हे शक्य झाल्यामुळे फडतरे यांनी आई -वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय पातळीवरिल यशामुळे सर्वञ अभिनंदन केले जात आहेhuwa