डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे श्री.
नवलमल फिरोदिया विधी,कामगार कायदे परिषद,फेडरीच इबर्ट स्टिफंग,एन.एम.आय.एम.एस.मेहता विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे दोन दिवसीय कामगार कायदे परिषदेचे उदघाटन संपन्न झाले.या दोन दिवसीय कामगार कायदे परिषदेचे उदघाटन कामगार कायदे मंडळाचे अध्यक्ष डॉ.श्री.एस. सी.श्रीवास्तव,अंतरराष्ट्रीय विधी व संशोधन विद्यापीठ गोवा चे प्र-कुलुगरू डॉ.श्री.व्यंकटराव , डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी विद्यापीठ चेन्नई चे प्र-कुलुगरू डॉ.श्री.संतोषकुमार,पुणे येथील उद्योग व कामगार न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश श्री.सुधीर कुमार बुके,डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व विधी महाविद्यालय समितीचे अध्यक्ष ऍड.अशोक पलांडे, डॉ.सुनीता आढाव या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनीता आढाव यांनी केले. यावेळी बोलताना आगामी काळामध्ये कामगारांच्या कायद्यामध्ये आपल्या सारख्या तरुण संशोधकांनी संशोधन करण्याची गरज आहे असे मत श्री.श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.तसेच कामगारांच्या हक्कासाठी व न्यायासाठी वेळोवेळी कायद्यांमधील तरतुदी ह्या गरजेच्या आहेत असे मत उद्योग व कामगार न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश श्री.संतोषकुमार बुके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच विविध मान्यवरांनी कामगार व त्यांच्या विषयी कायद्यामध्ये होणाऱ्या बदलांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक प्रा.प्रज्ञा यादव यांनी केले तसेच आभार सहाय्यक प्रा.पूजा देव यांनी व्यक्त केले.