महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी मनसेचे आशिष साबळे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी जाहीर केली असून आशिष साबळे हे मनसे पक्ष स्थापनेपासून कार्यरत असून युवकांच्या प्रश्नांवर त्यांचे कार्य असून, तरुणाई मध्ये विशेष लोकप्रिय आहेत. पक्षात ह्या पूर्वी ते विद्यार्थी सेनेला शहर अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
छायाचित्र : आशीष साबळे पाटील