पुणे वृत्तांत – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत भोंगे उतरवण्याचे मेहेरबान कोर्टाचे आदेश आहेत, आज पुण्यातील खडक पोलीस स्टेशन येथे मनसे तर्फे पत्र देऊन पोलीस बांधवांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन करून खडक पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये असणार्या अनधिकृत भोंग्या वर त्वरित कारवाई करावी असे म्हणले आहे,कोणत्याही धर्माच्या भावना दुखवायचा आमचा हेतू नाही, प्रार्थना करण्याला ही विरोध नाही पण भोंगे कशासाठी ??? विद्यार्थी, वयोवृद्ध, मानसिक तणावात असणार्या लोकांना त्रास होत नाही का ? राजसाहेब यांच्या भाषणाचा विपर्यास करून, चुकीचा मेसेज समाजात पसरवणारया लोकांवर कारवाई करायची सोडून मनसे च्या पदाधिकारी यांना नोटिसा कसल्या देता ? असा प्रश्न आशिष साबळे यांनी पोलिसांना केला ? गणपती,नवरात्र आली की कारवाई…नियम दाखवत वेळेचे बंधन…मग आत्ता पोलीस प्रशासन यांनी ही सर्वोच्च न्यायालयाने आखलेले नियम पाळून कारवाई करावी!!!!
कोंढवा भागात राजसाहेब मुर्दा बाद ह्या घोषणा दिल्या गेल्या,दोन समाजात तेढ निर्माण केला गेला तेव्हा कुठे होते पोलीस बांधव ? ओवेसी गरळ ओकत होता तेव्हा का नाही काढला मोर्चा…झोपले होते का तेव्हा हे तेढ निर्माण करणारे मुस्लिम नागरिक ? असा, सवाल त्यांनी केला.
लवकर हे अनधिकृत भोंगे काढा अन्यथा आम्ही १०० टक्के आमच्या प्रभागात असणार्या मक्का मस्जिद,गुरुवार पेठ येथे सामूहिक हनुमान चालीसा पठण करणार आहोत असा इशारा आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे.
आणि आत्ता फक्त “हनुमान चालीसा” पठण आहे “शिव तांडव” स्तोत्र ची गरज पडू नये याची ही काळजी घ्या हा सल्ला त्यांनी दिला.
श्री. वसंत मोरे यांच्या विषयी विचारले असता कोणताही प्रतिक्रिया साबळे यांनी दिली नाही,फक्त राजसाहेब हे आमचे “दैवत” असून राजसाहेब म्हणतील तीच पूर्व दिशा असे ते म्हणाले,तसेच राजसाहेब यांनी अनेकांना मोठे केले आहे पण काहींना स्वार्थ आठवत असतो आणि ज्यांच्या कृपेने आपण लोकप्रतिनिधी आहोत हे विसरून,लोकप्रतिनिधी म्हणून आमची भूमिका आहे असे सांगतात त्यांच्याविषयी आम्ही काय बोलावे ? राजसाहेब यांनी महाराष्ट्राला काय तो योग्य मेसेज दिला आहे असे श्री. साबळे यांनी स्पष्ट केले.