गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेडचे नाव विविध कारणांनी देशभर चर्चिले जाता असल्याचं आपण पाहतो आहोत. अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगावं, इतिहासातील शिवकालीन प्रसिद्ध खरडा किल्ला अशा अनेक छोट्या-मोठ्या ऐतिहासिक गोष्टिंमुळे कर्जत-जामखेडची देशभरात ओळख आहे. अशातचं रोहित पवार या पवार घरण्यातील नव्या दमाच्या नेतृत्वाने कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातुन विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आणि कर्जत-जामखेडचे नाव कायमचं चर्चेत येवू लागले.
विधानसभा २०१९ ची निवडणुक जिंकल्यापासुन रोहित पवार यांनी विविध विकासकामांचा सपाटा लावल्याने येथील जनताही आपल्या नेतृत्वावर खुश असल्याचे बघयाला मिळते आहे. पाणी, आरोग्य, शिक्षण, बचतगट अशा विविध क्षेत्रातील सुरु असलेल्या कामांसोबतचं जामखेडच्या वैभवात भर घालणारे एक आगळ-वेगळ काम रोहित पवारांनी हाती घेतले ते म्हणजे थोर महापुरुषांच्या भिंतीचित्राची मालिका. रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन कर्जत-जामखेडमध्ये जवळपास १९ थोर व्यक्तिची मोठी भिंतीचित्रे साकारली आहेत.
यामध्ये पुरोगामी महाराष्ट्र उभारण्यात महत्वाचा वाटा असणारे शाहु-फुले-आंबेडकर यांच्याबरोबरच देशाचा स्वाभिमान आणि अभिमान असणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपुरुष महात्मा गांधी, शास्त्रज्ञ आणि देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम, राणी अहिल्यादेवी होळकर जगप्रसिद्ध समाजसेविका मदर टेरेसा, शिक्षणाची गंगा सामान्यापर्यंत घेवून जाणारे कर्मवीर भाऊराव पाटिल, साहित्याचं विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे शिवशाहिर आण्णा भाऊ साठे, थोर स्वातंत्र्य सेनानी मौलाना अबुल कलाम आझाद, अशा विविध महापुरुषांचा यामध्ये समावेश आहे. रोहित पवारांच्या ह्या भिंतीचित्रांच्या संकल्पनेतून सर्वधर्म समभाव मुल्याच्या आदर्शाप्रमाणेच सदर महापुरुषांचे विचार आणि कार्य लोकांपर्यंत पोहचवने हा यामागील उद्देश आहे. कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये काढलेल्या या चित्रांमुळे शालेय विद्यार्थ्यांना देखिल चित्रावरुन सदर महापुरुषांचे विचार आणि कार्य जाणून घेण्याचा उपक्रम मिळाल्याने त्यांच्यामध्ये सुद्धा या कलेविषयी आकर्षण निर्माण झाले आहे.
मुळातचं कला शाखेच्या कुठल्याही अभ्यासक्रमात न शिकवली जाणारी भिंतीचित्राची कला एक प्रोसेस असून निलेश आर्टिस्ट यांनी ती ‘सरावातून सिद्धि’ प्राप्त केल्याप्रमाणे अजमावली आहे. चित्र काढावयाच्या भिंतीच्या निवडिसाठि रेकी करण्यापासुन ते भिंत मालकाची परवानगी घेवून चित्र वास्तवात येईपर्यंत अनेक छोट-छोट्या परंतु आव्हानात्मक गोष्टिंचा यामध्ये समावेश असतो. पहाडाच्या किंवा क्रेन च्या मदतीने भिंतीशी हितगुज करत निलेश आर्टिस्ट यांच्या ब्रशच्या स्ट्रोक्स ने जणु कर्जत-जामखेडच्या वैभवात भर घातली आहे.
लॉकडाउनमुळे अनेक बड्या व्यावसायिकांचे सुद्धा व्यवसाय ठप्प होवून ते हतबल झालेले बघून कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांवर बेतलेल्या परिस्थितिची कल्पना न केलेलीचं बरी. सरकारद्वारा पुरवील्या जाणाऱ्या विविध मदतीपासून कायमचं वंचित राहणाऱ्या ह्या घटकातील निलेश आर्टिस्ट यांना रोहित पवारांनी कर्जत-जामखेमध्ये कामाची संधि उपलब्ध करुन दिली. यातूनचं रोहित पवारांची कलेविषयीची आवड आणि कलाकारांविषयी असणारी जाणीव प्रदर्शित होते. कर्जत-जामखेड़मध्ये विविध कामे करत असताना आवश्यक असणारे सहकामगार/कलाकार हे स्थानिक असावे असा रोहित पवार यांचा कायमचं अट्टहास राहिलेला आहे. स्थानिकांना प्राधान्य दिल्यास त्यांनाही उपजीवेकेचे साधन निर्माण होत असते.
*एकाच गावात/ मतदारसंघात किंवा तालुक्यात कुठल्याही एका कलाकाराने इतके विविध चित्रे काढण्याचं देखिल रेकॉर्डचं होणारं आहे. ही सर्व जबाबदारी लीलया पेलणारे चित्रकार निलेश आर्टिस्ट आणि टीम ने रोहित पवारांच्या संकल्पनेला न्याय देवून कर्जत-जामखेडला पर्यटनाच्या दृष्टीने वळण्यास पहिले पाऊल टाकले आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. अशाप्रकारे रोहित पवारांची भिंतीचित्राची संकल्पना वास्तवात उतरवून कर्जत-जामखेडचा नावलौकिक देशभरात होण्यासाठी निलेश आर्टिस्ट यांनी घेतलेले कष्ट देखिल महत्वाचे आहे.*