छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारतातील सर्वात मोठ्या भित्तीचित्राचे अनावरण आ.रोहितदादा पवार यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी शिवजयंतीच्या पूर्व सांधेला नारायणपेठेत झाले. या प्रसंगी राष्ट्रवादी कोंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,चित्रकार निलेश खराडे, दीपक मानकर, दत्ता सागरे, गजानन पंडित, विशाल धनवडे, उमेश गालिंदे, अनिल येणपुरे, राजेंद्र पंडित, संदीप गायकवाड आदीमान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे चित्र चित्रकार निलेश खराडे यांनी पुणे महानगर पालिकेच्या नारायणपेठेतील साने वाहनतळाच्या भिंतीवर ५५ फुट उंच व २२ फुट रुंद असे रेखाटले आहे. या प्रसंगी बोलतांना आ.रोहित पवार म्हणले “या चित्रामुळे छत्रपती शिवरायांचा आदर्श सर्वांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश काकडे यांनी तर आभारप्रदर्शन अनिल येणपुरे यांनी केले.
छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी निरंजन दाभेकर,निलेश खराडे,बाळासाहेब दाभेकर व मान्यवर