1966 साली वसलेल्या कामगार वसाहतीजवळ मेट्रो सुरू होणार आहे. या आधुनिकतेच्या नावाखाली तेथील सत्तर वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना विस्थापित करण्याचे काम सुरू आहे व त्या नागरिकांना हडपसर किंवा विमाननगर येथे विस्थापित होण्यास सांगण्यात येत आहे परंतु तेथील नागरिक शिक्षण, कामधंदे, व्यवसाय इत्यादींसाठी संबंधित परिसराशी एकरूप झाल्या असल्याने त्यांना विस्थापित होणे शक्य नाही,
प्रथमता फक्त मेट्रोचे कॉलम उभे करण्याकरता जागा पाहिजे व उर्वरित 80 टक्के जागा संबंधित राहणाऱ्या नागरिकांची असेल असे सांगितले गेले परंतु काही दिवसापासून त्यांना संपूर्णपणे विस्थापित करण्याचा घाट घातला गेला व त्यास तेथील नागरिकांचे प्रखर विरोध आहे
येत्या 30 मे पर्यंत त्यांना वेळ दिली असल्याने त्यांचा आक्रोश बाहेर येत आहे ,तेथील कोणताही नागरिक जागा सोडण्यास तयार नाही ,विमान नगर किंवा हडपसर येथे विस्थापित होण्याचे तेथील कोणत्याही नागरिकाची तयारी नाही, तरीसुद्धा दंडेलशाहीने व विकृत प्रशासकीय निर्णयाने तेथील नागरिकांना नोटीस बजावल्या जात आहेत, पोलिसांकडून जबरदस्तीने नोटीस घेण्यास भाग पाडले जात आहे अशी येथील नागरिकांची तक्रार आहे,
तेथील लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर असे लक्षात आले की लोकप्रतिनिधीसुद्धा यास विरोध करीत आहेत जर विस्थापित करायचे असेल तर शासन निर्णयाप्रमाणे दोन किलोमीटरच्या आत मध्ये विस्थापित केले जावे असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे तसेच विस्थापित झाल्यानंतर जी रक्कम बिल्डर कडे जाणार आहे ती रक्कम संबंधित झोपडपट्टीवासीयांना कडे दिली जावी असे त्यांचे म्हणणे आहे
नागरिकांचा आधुनिकतेला किंवा मेट्रोला कोणताही विरोध नाही परंतु गरीब व तेथे लहानाचे मोठे झालेल्या नागरिकांना नागरिकांची घरे हिसकावून किंवा संसार मोडून तेथे मेट्रो व्हायला नको अशी मागणी तेथील नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे जर बळजबरीने त्यांना तिथून हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास सर्व नागरिक रस्त्यावर उतरून जीवाची पर्वा न करता विरोध करतील व त्यानंतर जे होईल ते जबाबदारी शासनाची असेल असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे