वाडिया ज्युनिअर महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका प्रा.मीना आंबेकर लिखित “कोलाज-समृद्ध विचारांचा” पुस्तकाचे प्रकाशन रविवार दिनांक ४ जून रोजी संध्याकाळी ६.०० वाजता होणार आहे. या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या संत साहित्याच्या अभ्यासक डॉ.आरती दातार असतील. पी वाय सी हिंदू जिमखाना येथे हा समारंभ संपन्न होईल.प्रकाशक मयूर प्रकाशन. प्रा. मीना आंबेकर यांनी “स्पर्श” हा कविता संग्रह, “हितगुज” हा ललित लेख संग्रह, मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढवाल – हाऊ टू इम्पृव्ह युवर चाइल्डस इंटेलिजन्स (इंग्रजीतून), “मुलगी हवी हो मुलगी” हे पथनाट्य असे विविध स्वरूपाचे लेखन केले आहे. आपल्या मनातील विविध विचारांचा आपल्या शरीर व मनावर होणार्या परिणामांचा अभ्यासपूर्ण व सकारात्मक विचारांच्या लेखांचा “कोलाज” म्हणजे हे पुस्तक, प्रत्येक वाचकाचे जीवन अधिकाधिक समृद्ध व आनंदी व संपन्न होण्यासाठी या पुस्तकाचा सर्व वयोगटातील वाचकांना उपयोग होईल असे लेखिका प्रा.मीना आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत संगितले.