*अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षीय भाषणावर रविवारी संवादाचे आयोजन*

Share This News

“अभ्यासू महाराष्ट्रीय” गटाच्या वतीने पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये होणार कार्यक्रम, विधान परिषद उप सभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे अध्यक्षस्थानी अभ्यासू महाराष्ट्रीय हा विविध शहरांतील जागरूक नागरिकांचा एक गट आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींबाबत कोणतीही ताठर भूमिका न घेता, उपलब्ध तथ्यांच्या आधारे सारासार विवेक व संवेदनशीलता राखून, अभ्यासपूर्ण विवेचन करणे हे अभ्यासू महाराष्ट्रीय या गटाचे उद्दिष्ट आहे. या “अभ्यासू महाराष्ट्रीय” गटाच्या वतीने वेगवेगळ्या विषयांवरील लेख अभ्यासू महाराष्ट्रीय आपल्या फेसबुक पेजवरून प्रसिद्ध करण्यात येतात. येत्या *रविवारी दिनांक २४ जुलै, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत* ज्येष्ठ साहित्यिक आणि *९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. भारत सासणे यांच्याशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या संवेदनशील व परखड भाषणातील मुद्दयांवर या संवादात अधिक सखोल चर्चा* संवादाचे आयोजन ‘अभ्यासू महाराष्ट्रीय’ ग्रुपतर्फे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम *सुमंत मुळगावकर सभागृह, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, सेनापती बापट मार्ग, पुणे येथे* होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान विधानपरिषदेच्या उप सभापती माननीय ना. डॉ. नीलम गोऱ्हे (Twitter – @neelamgorhe) या भूषविणार आहेत. या संवादात संवादक म्हणून श्रीमती वंदना बोकील-कुलकर्णी या असतील. या कार्यक्रमात काही जागा राखीव असतील. हा मुक्तसंवाद ‘अभ्यासू महाराष्ट्रीय (@abhyasumh)’ या फेसबुक पेजवरून https://www.facebook.com/abhyasuMH/ थेट प्रक्षेपित केला जाईल.