मानवसेवा-मानिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्व ४० समजबांधवांचा “राष्ट्रीय एकात्मता”पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यात ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, व हिंदू समाजातील समाजप्रमुखांचा समावेश होता. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी फादर मायकेल, माजी अति आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, अध्यक्ष आशियाखंड ओबेसिटी संघटना डॉ.श्रीहरी ढोरे पाटील, मानवसेवा मानिनीच्या अध्यक्ष संगीता पिंगळे, कार्याध्यक्ष दिलीप आबनावे. खजिनदार रियाझ पिरजादे, आदी मान्यवरांच्या बरोबरच सत्कारार्थी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.या प्रसंगी मार्गदर्शन करतांना फादर मायकेल यांनी सध्या एकमेकांमध्ये फुट पाडणे, द्वेष अशांतता पसरविली जात आहे. मात्र एकमेकांवर विश्वास व प्रेम ठेवल्यास सर्व लोकांमध्ये व पर्यायाने कुटुंब व देशामध्ये शांतता नांदेल असे प्रतिपादन केले.
छायाचित्र : पुरस्कार प्रदान करताना दिलीप आबनावे