महेश प्रोफेशनल फोरम ईस्टचा पदग्रहण समारंभ सुझलॉन येथे संपन्न झाला. अध्यक्षपदी भारती बाहेती यांची निवड करण्यात आली. तसेच पुढील वर्षासाठी अतुल सिकची यांची निवड करण्यात आली. तसेच अन्य संचालकांनी ही पदभार सांभाळला. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक सनातन धर्मदास प्रभुजी होते. त्यांनी मार्गदर्शन केले व आशीर्वाद दिले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले जीवनात अथवा व्यवसायात आभार मानने हे महत्वाचे यशाचे सूत्र आहे. ईश्वर व आपल्या जीवनातील व्यक्तींच्या छोट्या मोठ्या कार्याबद्दल आभारी असले पाहिजे असे प्रतिपादन केले.
छायाचित्र : सनातन धर्मदास प्रभुजी व संचलक यांचे समूहचित्र.