*महाराष्ट्र विद्यालयाचा शताब्दी महोत्सव मंगळवारपासून

Share This News

पुणे : समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सव मंगळवारी (ता. १६ मार्च) आयोजित करण्यात आला आहे. सहकारनगर येथील संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ११.३० वाजता संत साहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे कुलगुरू दादासाहेब केतकर, गुरुवर्य डॉ. ग. श्री. तथा अण्णासाहेब खैर व डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या प्रेरणेने १०० वर्षांपूर्वी महाराष्ट्र विद्यालयाची स्थापना झाली होती. यंदा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने कोरोनाचे सर्व नियम पाळून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.