*मनसेकडून पुणेकरांसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण*

Share This News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे च्या माध्यमातून शिवगर्जना प्रतिष्ठान पुणे व पुणे लोकमान्य फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेकरांसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण पुण्यातील प्रसिद्ध डॉ.शशांक शहा, डॉ.प्रसाद राजहंस, डॉ.कौस्तुभ शेंडकर, डॉ.राजेश टिळेकर यांच्या हस्ते काल (2-6-21) करण्यात आले.

यावेळी मनसे पक्षाचे अ‍ॅड गणेश सातपुते उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, शहराध्यक्ष वसंत मोरे, महीला अध्यक्ष रुपाली पाटील, शहरउपाध्यक्ष जयराज लांडगे,आशिष देवधर,कसबा विभाग अध्यक्ष गणेश भोकरे, योगेश खैरे, संतोष पाटील,निलेश हंडे, नरेंद्र फाळके, राजेश कांबळे पक्षाचे शहर आणि प्रभागातील पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. प्रभागातील नागरिक देखील या सोहळ्यास उपस्थित होते.

या प्रसंगी अ‍ॅड गणेश सातपुते म्हणाले की रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हे ध्येय मनात ठेवून कोरोनाच्या या महामारीच्या काळात गोरगरीब, गरजू रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका ही पुणेकरांसाठी संजीवनी ठरणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कोविड च्या संकट काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांनासाठी विविध उपक्रम आयोजित केले गेले.
मा. राज साहेबांनी सांगितल्या प्रमाणे जनतेला या संकटातून बाहेर काढणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

सदरील रुग्णवाहिका अ‍ॅड गणेश सातपुते यांच्या प्रयत्नातून त्यांनी पुणेकरांना उपलब्ध करून दिली असून ही रुग्णवाहिका पुणेकरांसाठी मोफत असणार आहे. कोणालाही वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका लागल्यास 9028823369 या संपर्क करावयाचा आहे. अशी माहिती ऍड गणेश सातपुते यांनी दिली.
शहर सचिव राकेश क्षिरसागर आणि रस्ते आस्थापना संघटक अजय राजवाडे आणि प्रभागातील धोंडीराम सरोदे,शंतनू उभे, अनिकेत गायकवाड,शेखर बाळे, प्रमोद कर्डे, विशाल कसबे आणि महाराष्ट्र सैनिक यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश महाले यांनी केले. तर अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी आभार मानले.

फोटोओळ – रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना अ‍ॅड. गणेश सातपुते, डॉ. शशांक शहा, मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे आदी मान्यवर