रास्ता पेठ येथे लायन्स क्लबच्या वतीने गरीब लोकांना मोफत कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्घाटन.

Share This News

लायन्स क्लब ऑफ पुणे कर्मवीर व अॅड.मनीष ढेंगळे & असोसिएटस यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब लोकांसाठी युनिटी कॉम्प्लेक्स रास्तापेठ येथे मोफत कायदेशीर सल्ला  केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी द्वितीय प्रांतपाल ला.राजेश कोठावडे, रिजन चेअरपर्सन ला.रविंद्र गोलर, प्रमुख पाहुण्या जिल्हा न्यायालयाच्या निवृत्त न्यायधिश अंजली आपटे, लायन्स क्लब  पुणे कर्मवीरचे अध्यक्ष ला.सुभाष गोयल, सेक्रेटरी श्रीलक्ष्मी देशपांडे, खजिनदार शिवाजी ढवळे, केंद्राचे मुख्य संयोजक अॅड.मनीष ढेंगळे, लिओ निखिल गोयल,  कार्यक्रमाच्या संचालिका ला.प्रियंका शर्मा, इरफान सय्यद  आदी मान्यवर उपस्थित होते

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी मान्यवर.