पर्णकुटी ही संस्था गेली ११ हुन अधिक वर्षे देशातील तीन राज्यांमध्ये युवती, महिला व लहान मुले यांच्यासाठी काम करत आहे. पर्णकुटी संस्था अल्प उत्पन्न गटातील, तसेच विधवा व एकल तरुणी व महिला तसेच देवदासी, देहविक्रय करणाऱ्या महिला, LGBTQ समुदायातील गरजू व होतकरू व्यक्ती यासर्वांसाठी काम करत असून त्यांना व्यवसायाभिमुख कौशल्ये शिकवून आर्थिकदृष्ट्या साक्षर व सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
संस्थेतर्फे नुकतेच पुण्यातील वडगाव शेरी भागात नवीन कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे, जिथे वडगाव शेरी, चंदननगर, विमाननगर या भागातील गरजू व होतकरू मुली व महिला यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. या कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे नुकतेच समर्थ हॉल, वडगाव शेरी येथे शनिवारी २१ जानेवारी रोजी विविध क्षेत्रातील तज्ञ् व नामवंतांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना संस्थेच्या सह संस्थापक स्नेहा भारती यांनी संस्थेच्या कामाची उपस्थितांना ओळख करून दिली. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पर्णकुटी संस्था तरुणी व महिलांनी व्यवसायाआधारित कौशल्ये शिकून त्यांनी भविष्यात त्यांचा व्यसवाय चालू करावा तसेच त्यांनी आर्थिकदृष्ट्या साक्षर व सक्षम व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच सहकार व सहकार्य यावर विश्वास असणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्या सोबत एकत्र मिळून काम करत जास्तीत जास्त तरुणी व महिलांना गुणवत्तापूर्ण कौशल्ये शिकवून त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर व सक्षम बनवण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेतर्फे टेलरिंग, ब्युटी पार्लर, भरतकाम, मसाले बनविणे, केक बनविणे असे अनेक व्यवसायाभिमुख कोर्सेस विनामूल्य शिकविले जाणार आहेत.
याप्रसंगी पर्णकुटी संस्थेच्या अध्यक्षा रंजना सिंग , इंडियन स्पॉन्सरशिप कमिटीच्या वतीने क्रांती मॅडम, ARC (ऍक्शन फॉर द राईट्स ऑफ द चिल्ड्रेन) या संस्थेच्यावतीने पौर्णिमा गाडिया मॅडम, सुशांत आशा व मंदार शिंदे सर, फॅमिली प्लँनिंग असोसिएशन ऑफ इंडिया चे अभिजित लोंढे सर, स्वस्ति हेल्थ कॅटॅलीस्ट संस्थेच्या वतीने शिवाजी मोरे , टेक महिंद्रा स्मार्ट अकॅडेमीच्या वतीने सहेलिका शहा व सुहास कांबळे सर, पुणेरी प्राईड फाऊंडेशनचे बिपीन दुर्गाई, डॉकबॉयझ कंपनीचे सह संस्थापक प्रशांत कुमार सर, लोनटॅप कंपनीचे CEO सत्यम कुमार, जनविकास नवसंकल्प फाऊंडेशनच्या निलम अय्यर मॅडम, अशोक कदम सर व अश्विनी भागवत मॅडम अशा कित्येक माननीयांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम लोंढे व नेहा ठाकूर यांनी केले.