लता टाकळकर या गृहिणी जिद्दीने १० पास.

Share This News

सौ. लता महादेव टाकळकर या १९८५ साली दहावी परीक्षेत गणित राहिल्याने अनुत्तीर्ण राहिल्या. काही अडचणीमुळे तो पूर्ण करता आला नाही. त्यांचा मुलगा २२ व्या वर्षी C.A सनदी लेखापाल झाला. मात्र स्वत:चे १० वी न झाल्या मुळे काही ठिकाणी फॉर्म भरताना १० अट असते त्यामुळे त्यांनी १० पूर्ण करण्यासाठी जिद्दीने फॉर्म भरला. दरम्यानच्या काळात त्यांनी स्वता: शिवणावर २ पुस्तके ही लिहिली व फॅशन डिझायनर म्हणून यशस्वी ही झाल्या. त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेवून पुन्हा तयारी करून दिलेल्या परीक्षेत त्या पास झाल्या यात त्यांच्या कुटुंबाचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

छायाचित्र : लता टकाळकर – चौधरी