गेली अनेक महीने कोरोनाच्या त्रासाने संपूर्ण जगात व भारतात ही अनेक क्षेत्रात कहर केला.मात्र आज दिनांक १६\१\२०२१ पासून देशभरात सीरम इंस्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस देवून जगातील या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील देवून सुरुवात केली.या अनुषंगाने पुण्यात पहिला कार्यक्रम कमला नेहरू हॉस्पिटल येथे महापौर मुरलीधर मोहोळ,उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे,वैद्यकीय अधिकारी,व स्टाफ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी या मोहिमेचे ४ टप्पे असून त्याप्रमाणे लसीकरण करण्यास मनपा प्रशासन सज्ज असल्याचे संगितले.
