कल्परूण सोशल फाउंडेशन आणि वेदिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन 70 रक्तदात्यांनी केलं रक्तदान

Share This News

पुणे – पुणे येथील प्रसिद्ध कल्परूण सोशल फाउंडेशन आणि वेदिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली म्हणून बालविकास शाळा, लोकमान्य नगर,नवी पेठ, पुणे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ‘इंडियन सेरॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर, पुणे या रक्तपेढीने रक्त संकलन केले. फाउंडेशन चा रक्तदान शिबिराचे हे प्रथम वर्ष होते. या कार्यक्रमासाठी पराग मते (मामा)आणि राज देशमुख सरांचे मार्गदर्शन लाभले व कल्परूण सोशल फाउंडेशन आणि वेदिका फाउंडेशनचे नरेंद्र डोईफोडे,विकास झेंडे, विनित वांजळे, अक्षय भागवत, शैलेंद्र माने, प्रशांत बावडेकर, मेघा डोईफोडे, तन्मय तोडमल, राहुल भंडारे, गणेश झाडबुके, अरुण चांदेकर ,समीर डफेदार आणि सौ.शबनम डफेदार व सर्व मित्र परिवार आणि कुटुंबीयांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी हॉलची व्यवस्था करून दिल्याबद्द्ल विशेष आभार लोकमान्य नगर सदनिका धारक संघ, प्रश्नात मोहोळकर आणि गणेश झाडबुके आभार मानले