जैन सोशल ग्रुप डायमंडच्या अध्यक्षपदी कमलेश चोपडा.

Share This News

पुणे (दि.३) जैन सोशल ग्रुप या आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थेच्या पिंपरी चिंचवड भागातील जैन सोशल ग्रुप डायमंड पी सी संस्थेच्या अध्यक्षपदी कमलेश चोपडा यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रशांत गांधी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. मधुरा बॅंक्वेट हॉल रावेत येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र रिजनचे दिलीप चेरबेले, जैन सोशल ग्रुप रिजनचे लालचंदजी जैन, राजेंद्रजी धोका, हसमुखजी जैन, नाशिकचे सचिन शहा, डॉ.राजेशजी दोषी, सुजसजी शहा, सौरभजी शहा, तिमिरजी संघवी, चंचलजी कुचेरिया आदी मान्यवरांच्या बरोबरच जैन समाजातील विविध संघाचे अध्यक्ष व स्नेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सेक्रेटरी गिरीशजी कोठारी यांनी केले.
छायाचित्र : कमलेशजी चोपडा.