“आपण सर्वांनी प्रभू वचन पालन करून आत्मकल्याण साध्य करावे, आपणच आपले शत्रू बणू नये कारण आपले नुकसान दुसर्या पेक्षा आपणच करून घेत असतो, आपल्यात जो बिघाड असतो तो आपल्या मुळेच असतो त्यामुळे सुधारही आपणच करू शकतो” असे प्रतिपादन आचार्य अभयशेखर सूरीश्वरजी यांनी केले. ईशा पर्ल जैन संघाच्या वतीने आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी आचार्य पुण्यारत्न सूरीश्वरजी, आचार्य यशोरत्न सूरीश्वरजी, आचार्य विमलबोधी सूरीश्वरजी, चिराग दोशी, सुधीरभाई शहा, सागर शहा, अनिल शहा, राकेश शहा, कांजीभाई गाला, रिची शहा, अर्णिक शहा, राजीवभाई शहा आदी मान्यवरांच्या बरोबरच मुनीगण,साध्वीगण व भाविक उपस्थित होते.
छायाचित्र : आचार्य अभयशेखर सूरीश्वरजी महाराज मार्गदर्शन करताना.