“महिलांनी उद्योग व्यवसायात पदार्पण करताना सर्वात प्रथम आपण यशस्वी होणारच असा दृढ निश्चय करावा, यश हे मिळतेच, घर सांभाळत असताना अनेक उद्योजकीय कौशल्ये महिलांत असतात असे प्रतिपादन रत्नावली इंगळे (कॅफे मी अँड यू संस्थापक) यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला उद्योजकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे आयोजन J4E( जस्ट फॉर आंत्र प्रिनर्स)चे संस्थापक विशाल मेठी, यांनी केले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उद्योजिका वासंती मुळजकर यांनी उद्योग हा काही काळ करण्याचे काम नसते तर ती निरंतर प्रक्रिया असते. सतत नवे लोक जोडणे आवश्यक असते असे सांगितले. हॉटेल आशीष प्लाझा येथे जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात ५० हून अधिक उद्योजक सहभागी झाले.महिला उद्योजकांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रिदिमा शहा यांनी केले.
छायाचित्र : मार्गदर्शन करताना रत्नावली इंगळे.