उद्योग व्यवसाय करताना कायम मार्गदर्शनाची आणि सल्ल्याची गरज असते. कोरोनामुळे सगळ्याच व्यवसाय आणि उद्योगांना फटका बसलाय त्यामुळे सगळ्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. नव उद्योजकांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या J4E(Just 4 Entrepreneurs)ने सर्व उद्योजकांना अशी संधी उपलब्ध करून दिली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातली दिग्गज कंपनी असणाऱ्या पर्सिस्टंटचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे हे उद्योजकांशी संवाद साधणार असून त्यांना थेट प्रश्न विचारण्याची संधीही मिळणार आहे. J4Eने या खास कार्यक्रमाचं आयोजन केलं असून J4Eच्या सोशल मीडिया चॅनल्सवर हा कार्यक्रम लाईव्ह होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फक्त रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल येणार असून तुमची जागा निश्चित होईल. अमेरिकेतून डॉक्टरेट मिळवल्यानंतर डॉ. आनंद देशपांडे यांनी पुण्यात पर्सिस्टंट ही सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. छोट्या उद्योजकांना मदत करण्यासाठी त्यांनी deAsra फाउंडेशनची स्थापना केली. अशा दिग्गज मान्यवरांसोबत संवाद साधण्याची आणि त्यांना प्रश्न विचारण्याची ही मोठी संधी आहे. ही संधी चुकवू नये असं आवाहन J4Eचे संस्थापक विशाल मेठी यांनी केलंय. या कार्यक्रमानंतर सहभागी झालेल्या सगळ्या उद्योजकांना नेटवर्किंग करण्याची संधीही मिळणार आहे. तुम्हाला नवीन व्यवसाय/Startup सुरू करण्याची इच्छा असेल, नवीन आयडिया असतील, असलेला व्यवसाय वाढवायचा कसा? संकटांमधून मार्ग कसा काढायचा? टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा? भांडवलं कसं उभं करायचं? व्यवसाय सुरू करण्याठी क्षेत्र कसं निवडायचं? असे अनेक प्रश्न तुम्ही विचारू शकता. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या पर्सिस्टंटला कंपनीला शिखरावर नेत दीर्घकाळ म्हणजे 30 वर्षांपासून डॉ. आनंद देशपांडे हे कंपनीचं नेतृत्व करत आहेत. जगभरातून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात येतं. उद्योजक, व्यावसायिक, मार्केटिंग विषयातले तज्ज्ञ, मॅनेजमेंटचे विद्यार्थी आणि या विषयात आवड असलेले सर्व या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक – https://us02web.zoom.us/meeting/register/tZ0udeqhrDopHNz_quHf-wwOLtLKATZw6xVE अधिक माहितीसाठी संपर्क – 93569 96270 तारीख – 5 फेब्रुवारी, शनिवार वेळ – 03:30 PM to 5.30PM स्थळ – Zoom, तुमचं घर.
कार्यक्रमाचे आयोजक :विशाल मेठी,वसंती मुळजकर,सपना बापट,गौरव शर्मा,धवल ठकर,निलेश कोमटवार,आयुष जैन,वैशाली अपराजित,कपिल तनेजा,चंद्रशेखर लोखंडे,