आयएसएएस ब्युटी स्कूल येथे पहिला “राष्ट्रीय सलोन दिवस” साजरा.

Share This News

आयएसएएस ब्युटी स्कूल येथे “पहिला राष्ट्रीय सलोन”दिवस साजरा करण्यात आला. कोरेगाव पार्क येथील मुख्यालयात साजरा झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयएसएएस ब्युटी स्कूलच्या संचालक भक्ति सपके, संचालक संतोष सपके, आहीबा असोसिएशनच्या संगीता चौहान, अशोक पालीवाल उदय टक्के, आदी मान्यवरांच्या बरोबरच संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना भक्ति सपके यांनी गेल्यावर्षी कोरोना काळात सर्व उद्योगांना  कार्य सुरू करण्याची परवानगी मिळाली होती मात्र सलोन उद्योगाला मिळाली नव्हती म्हणून सेव्ह सलोन इंडिया चळवळ उभी राहिली व सर्व असोसिएशन्सनी मिळून देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना ईमेल, व ट्विटस  केले. या एकतेला यश मिळून सलोन उद्योग सुरू करण्यास परवानगी मिळाली.   म्हणून सर्व असोसिएशन्सनी दर वर्षी ११ ऑगस्ट हा “राष्ट्रीय सलोन दिन” साजरा करण्याचा निर्णय झाला असे संगितले.

छायाचित्र :पहिला राष्ट्रीय सलोन दिन साजरा करताना मान्यवर,कर्मचारी व विद्यार्थी.