हॉटेल व्यवसायिकांना एकत्र करणारी युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशनची पहिली वार्षिक बैठक पुण्यात नुकतीच पार पडली. या बैठकीची सुरुवात दीपप्रज्वलन मा. महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक फत्तेचंद रांका, महेंद्र पितालिया, असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग, उपाध्यक्ष ॲड. अजिंक्य शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच सुप्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. व वायू ऍपचे उदघाटन केले. या प्रसंगी असोसिएशनचे सचिव दर्शन रावल, खजिनदार समीर शेट्टी, माहुवा नारायण, राहुल रामनाथ, ऍड. अजिंक्य उडाने आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना मोहोळ म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल व्यवसायिकांची खूप मोठ्या प्रमाणात ससेहोलपट झाली होती. या शहराचा प्रथम नागरिक या नात्याने मी या हॉटेल व्यवसायिकांच्या पाठीशी उभा राहिलो होतो. कोरोनाच्या काळात सर्वात जास्त नुकसान हॉटेल व्यवसायिकांचे झाले होते. त्याच बरोबर हॉटेल व्यवसायिकांनी सामान्य नागरिकांना त्या कठीण काळात मदत केली .कोरोनाच्या काळात हॉटेल व्यावसायिकांवर आंदोलनामुळे दाखल करण्यात आलेले गुन्हे मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना समक्ष भेटून माघारी घ्यायची विनंती करेन. कोरोनाच्या काळात पुण्याची खाद्यसंस्कृती जपण्याचे काम हॉटेल व्यवसायिकांनी केले आहे.
उद्योजक फत्तेचंद रांका म्हणाले की कोरोनाच्या काळानंतर हॉटेल व्यवसायिकांची पहिली बैठक उत्साहात पार पडली. यामध्ये भविष्यात मोठमोठी आव्हाने हॉटेल व्यवसायिकांवर येथील मात्र हॉटेल व्यवसायिकांनी घाबरून न जाता खंबीरपणे पाय घट्ट रोवून उभे राहिले पाहिजे. त्याच बरोबर हॉटेल व्यवसायिकांनी त्यांची एकी कायम ठेवली पाहिजे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष या नात्याने मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.
महेंद्र पितालिया या त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की हॉटेल व्यवसायिकांनी भविष्यकाळात येणारे आव्हाने ओळखून त्यावर उपाय योजना काढल्या पाहिजेत. त्याचबरोबर या व्यवसायात टिकून राहणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग म्हणाले की ही संस्था आम्ही दोन वर्षांपूर्वी पाच लोकांनी सुरू केली होती. आत्ता या संस्थेमध्ये 700 पेक्षा जास्त सदस्य आहेत. तर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये पुणे, महाराष्ट्र आणि भारतातून दोनशेहून जास्त सदस्यांनी सहभाग घेतला होता. भविष्यकाळात आमचे एक स्वतःचे ॲप येणार आहे. यामध्ये हॉटेल व्यवसायिकांना त्यावर इतंभूत माहिती मिळेल. आम्ही याच बरोबर आपत्तीकालीन निधी उभारणार आहे. .
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनल पाटील यांनी केले तर आभार दर्शन रावल यांनी मानले