व्यवसाय- उद्योगात यशस्वी होणे व त्यात वाढ होणे यासाठी आत्मविश्वास, जिद्द, प्रामाणिक पणा आवश्यक तर असतोच मात्र सर्वात महत्वाचा म्हणजे पत- विश्वास सांभाळणे हे होय. कारण सर्व काही मिळवता येते पण विश्वास नाही. असे प्रतिपादन उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी केले. हार्मनी बिझनेस कनेक्ट या संस्थेच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. आमानोरा क्लब हडपसर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ उद्योजक वालचंद संचेती, कृष्णकुमार गोयल, हार्मनी बिझनेस कनेक्टचे संस्थापक विशाल अग्रवाल, सतीश शिंदे, आदी मान्यवरांच्या बरोबर विविध क्षेत्रांतील उद्योजक उपस्थित होते.
छायाचित्र :केक कापताना मान्यवर.