वंचित आणि बहुजनांसाठी कै.गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य अविस्मरणीय असल्याचे मत भाजपा चे संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे यांनी व्यक्त केले. गोपीनाथरावांनी भारतीय जनता पक्ष हा सामान्यांपर्यंत नेला आणि आज भाजपा सर्वत्र सत्तेवर आहे, पक्षाला स्वर्णिम दिवस बघायला मिळत आहेत त्यामागे मुंडे साहेबांचा मोठा वाटा असल्याचे ही त्यांनी सांगितले. कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्ताने शिक्षण समिती अध्यक्ष, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी मोहीम राबविण्याचा निर्धार केला आहे, या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी *शिक्षण समिती अध्यक्ष, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,भाजप चे शहर सरचिटणीस दीपकजी पोटे, शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, शहर चिटणीस प्रशांत हरसुले,प्रभागातील सरचिटणीस निलेश गरुडकर, ऍड. प्राची बगाटे,महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, महिला मोर्चा सरचिटणीस केतकी कुलकर्णी, उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ,उपाध्यक्ष जयश्री तलेसरा,सहकार आघाडीचे सरचिटणीस शंतनू खिलारे, महिला मोर्चा आय टी प्रकोष्ठ च्या शहर संयोजिका कल्याणी खर्डेकर, उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष रामदास गावडे, पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेच्या मुख्याध्यापक एलिझाबेथ काकडे,नयनतारा आय क्लिनिक च्या डॉ. मेधा परांजपे,युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक खर्डेकर,सहाय्य्क ज्योती पवार* यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंजुश्रीताईंनी हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य असून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याच्या संकल्पाला अनुसरून आहे, असेच सेवा आणि त्यागाची परंपरा गोपीनाथरावांनी जोपासली व आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती चे काम ते करत असत अश्या आठवणी ही राजेशजी पांडे यांनी जगविल्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्य व नेत्र तपासणीच्या उपक्रमासाठी सी एस आर मधून निधी उपलब्ध करून देऊ असेही ते म्हणाले. गोपीनाथराव मुंडे यांचे सामान्यांसाठी चे कार्य अफाट होते व ते नेहमीच लोकांपर्यंत जे नाही ते पोहोचावे यासाठी आग्रही असत असे सांगतानाच मंजुश्री खर्डेकर यांनी कोरोना काळात शाळा बंद असल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याचे सांगितले.ऑनलाईन शाळेमुळे विद्यार्थी स्मार्टफोन चा अतिरेकी वापर करत असून त्याचा परिणाम मुलांच्या डोळ्यावरच नव्हे तर एकूण आरोग्यावर होतं असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात, म्हणून आत्ता सातवी, आठवी नववी च्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व शाळा सुरु झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीवर भर देत असल्याचे शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. कै. मा. ग. आचवल ट्रस्ट, क्रिएटिव्ह फाउंडेशन व नयनतारा आय क्लिनिक च्या वतीने ही शिबीरे आयोजित करत असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आणि माझा कौटुंबिक स्नेह होता व साहेब हे स्वभावाने अतिशय हळवे होते,ते सतत कार्यमग्न असत व सेवाकार्याला प्राधान्य देत असत म्हणून त्यांच्या प्रत्येक जयंती व पुण्यतिथीला सामान्यांना केंद्रबिंदू मानून विविध उपक्रम आयोजित करतो असे भाजप प्रवक्ता व क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक जयंत भावे व महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले, संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.