पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून इनाना प्रोडक्शन प्रायव्हेट लि. पुणे, ही शॉर्ट फिल्म, वेबसिरीज, अल्बम सॉंगच्या दुनियेत गेली अनेक वर्ष आपले वेगळेपण टिकवून आहे. आता इनाना प्रोडक्शन प्रायव्हेट लि. मुली व विवाहित महिलांसाठी ‘Inanna beauty pageants’ ही भव्य सौंदर्य स्पर्धा घेवून आले आहेत. इनानाचे संचालक दीप्ती सिंग आणि प्रशांत सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत या स्पर्धेची घोषणा केली.
याप्रसंगी शिक्षणतज्ज्ञ स्वर्णलता रॉय (खालसा कॉलेज मुंबई), मृदुला मल्होत्रा (एमडी, एनडीडीवाय) आदी मान्यवर उपस्थित होते.
या विषयी माहिती देताना प्रशांत सिंग म्हणाले, मॉडेलिंग चि आवड असलेल्या मुलींबरोबरच विवाहित महिलांच्या प्रतिभेला, कला गुणांना वाव मिळावा व त्यांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना इनाना प्रोडक्शन प्रायव्हेट लि. आगामी शॉर्ट फिल्म, वेबसिरीज, अल्बम सॉंग व फीचर फिल्ममध्ये काम करण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत.
ही सौंदर्य स्पर्धा प्रमुख पाच विभागात घेण्यात येणार आहे. त्या खालील प्रमाणे –
Mrs. Maharashtra (दि. 1 मे 2022 , ठिकाण – पुणे)
Mrs. Gujrat (दि. 31 जुलै 2022, ठिकाण – सूरत / अहमदाबाद)
Mrs. North (दि. 30 ऑक्टोबर 2022, ठिकाण – दिल्ली)
Miss India (दि. 25 डिसेंबर, ठिकाण – मुंबई)
Mrs. India (दि. 25 डिसेंबर, ठिकाण – मुंबई)
इनानाचे संचालक दीप्ती सिंग म्हणाल्या, या सौंदर्य स्पर्धेतील Mrs. Maharashtra या विभागासाठी अंकित बाटला, अभिनेत्री फ्लोरा सैनी, अभिनेत्री, मॉडेल मुग्धा गोडसे, मीनाक्षी पांगे, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक वैभव देसाई हे ज्यूरी म्हणून काम पाहणार आहेत.
इनाना प्रोडक्शन प्रायव्हेट लि. पुणे, ही शॉर्ट फिल्म, वेबसिरीज, अल्बम सॉंग आणि फॅशनच्या दुनियेत कार्यरत आहे. दीप्ती सिंग आणि प्रशांत सिंग यांनी इनाना प्रोडक्शन प्रायव्हेट लि. कंपनी स्थापन केली आहे. दीप्ती सिंग या नावाजलेल्या उद्योजक, मॉडेल आणि निर्मात्या आहेत. त्यांनी अनेक सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला असून सौंदर्य स्पर्धेतील स्पर्धकांना त्या ग्रूमींग ही करतात. या वर्षी साऊथ कोरीया येथे होत असलेल्या ‘Mrs. Universe 2021’ सौंदर्य स्पर्धेत त्या भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. तर प्रशांत सिंग यांना बँकिंग, फायनान्स आणि मार्केटींग फील्ड मधील दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.
या स्पर्धेविषयी अधिक माहिती https://inannaproduction.com या वेबसाईटवर उपलब्ध असून येथे online Registration करता येणार आहे.