एक घास समाजासाठी परिवारचा प्रथम वर्धापन दिन संपन्न.

Share This News

चला महाराष्ट्र घडवू या अभियानांतर्गत कार्य करणारा “एक घास समाजासाठी परिवार”चा प्रथम वर्धापन दिन संपन्न झाला. श्री महात्मा बसवेश्वर भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रो.शिवराज पाटील(प्रवर्तक), धिरज बिराजदार, राघवेंद्र दलाल, मनोज माळी, रमेश तुपे, योगेश कुलकर्णी ,अतुल अघाव, आदी मान्यवरांच्या बरोबरच या परिवरातील सदस्य उपस्थित होते. आपण सर्व समजतील घटक आहोत. जे वंचित,गरजू,गरीब आहेत ते ही या समाजातील घटक असून त्यांना आपल्या वतीने यथाशक्ती मदत व्हावी या हेतूने या परिवाराची स्थापना झाली.आपले सण, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आदी या परिवरातील सदस्य अनाथ आश्रम, वृद्धाश्रम येथे मदत देवून साजरे करतात, या प्रथम वर्षात त्यांनी सुमारे ५ लाख रुपयांची मदत केली आहे. अनिकेत मतिमंद अनाथ आश्रम- बावधन, स्नेहछाया वंचित व गरीब आश्रम दिघी, निर्मलग्राम अनाथ आश्रम दिघी, किनारा वृद्धाश्रम कामशेत, स्नेहवन वंचित व गरीब आश्रम यांना कोरोना काळात मदत केली. आगामी काळात या परिवाराचा विस्तार करून अधिक गरजूंची सेवा करण्याचा मनोदय असल्याचे प्रो.शिवराज पाटील यांनी संगितले.

छायाचित्र :प्रो.शिवराज पाटील व एक घास समाजासाठी परिवरातील सदस्य.