बेंगलोर कर्नाटक येथील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था जी नॅकचे A++ दर्जा व यु.जी.सी मान्यता प्राप्त संस्थेची पी.एच.डी(डॉक्टरेट) डॉ.सुनंदा राठी यांना नुकतीच प्रदान करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या लठ्ठपणा साठी योगाचे प्रकार (Effect of integrated approach of yoga therapy on adolescent obesity (11 तो 17 years age group) हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. संस्थेच्या सभागृहात संस्थेचे कुलगुरू डॉ.एच.आर नागेंद्र यांच्या हस्ते डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या प्रबंधाचे मार्गदर्शक डॉ.पद्मिनी टेकूर, डॉ.एच आर.नागेंद्र, डॉ.नागरत्ना होते. मार्गदर्शक डॉ.एच. आर नागेंद्र हे एक शास्त्रज्ञ, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगगुरू व आयुष येथील योग शाखेचे अध्यक्ष आहेत. डॉ.सुनंदा राठी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.कॉम.एल.एल.बी. व पी.एच.डी प्राप्त केली आहे. कार्यपूर्तीसाठी या प्रबंधासाठी डॉ.सुनंदा राठी यांना उद्योजक व योगसाधक, सामाजिक कार्यकर्ते रामकुमार राठी यांचे सहकार्य लाभले.
छायाचित्र : डॉ.सुनंदा राठी.