डॉ.एस.डी.रावेतकर यांना इमापॅक सिंगापूरतर्फे “लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड” रंजन चक्रवर्ती (माजी व्हाईस प्रेसिडेंट फर्मोपिया) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुण्यात सुरू असलेल्या इंडिया बायोलाजेक्स आणि वॅकसिनस आऊटस्टँडिंग अवॉर्डस २०२२ हॉटेल हयात रिजन्सी मध्ये हा समारंभ पार पडला. मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. एस.डी.रावेतकर यांचे नाव ज्यूरी आणि पब्लिक वोटिंग मध्ये निवडण्यात आले. डॉ.एस.डी.रावेतकर हे पुण्यातील नावाजलेल्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये गेली ५० वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी प्रॉडक्शन, प्रोजेक्टस, मटेरियल व रिसर्च अशा वेगवेगळ्या विषयावर काम केले आहे. तसेच ते आजूनही कार्यरत आहेत.
छायाचित्र :एस.डी रावेतकर यांना अवॉर्ड प्रदान करताना रंजन चक्रवर्ती उजवीकडे.