पुणे दि.१२: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, संसदीय कार्य मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील,मंत्रीमहोदय मा. श्री. धनंजय मुंडे, मंत्रीमहोदय मा. श्री. अतुल सावे, आमदार श्री. जयंतभाई पाटील, आमदार श्री. रमेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा देवून अभिष्टचिंतन केले.
शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख श्री. रमेश कोंडे, नगरसेवक श्री. राहुल कलाटे, शिवसेना पुणे शहराध्यक्ष प्रमोद (नाना)भानगिरे, युवासेना महाराष्ट्र राज्य सचिव श्री. किरण साळी, शिवसेना महिला शहर प्रमुख श्रीमती पूजा रावतकर, शिवसेना पुणे शहर संघटक श्रीकांत पुजारी, रवींद्र ब्रह्मे, श्रीमती. स्वाती टकले, शर्मिला येवले, युवराज शिंगाडे, राजू विटकर यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, अबाल-ज्येष्ठांपासून अनेकांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना प्रत्यक्ष भेटून, दुरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यात शिवसैनिकांसह विविध राजकीय नेते, सामाजिक संस्था, उद्योजक, पत्रकार तसेच विविध संघटना आणि कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी आदींचा समावेश होता.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच ओघ सुरु झाला होता. राज्यभर डॉ. गोऱ्हे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची छायाचित्रे, ध्वनीचित्रफिती विविध समाजमाध्यमांवरही झळकली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे येथील ‘सिल्व्हर रॉक्स’ निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारल्या.
यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे यांनी उद्या राजभवन येथे होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, उद्या १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता महामहिम राज्यपाल मा. श्री. रमेशजी बैस यांचे शुभहस्ते “एैस पैस गप्पा नीलमताईंशी” या पुस्तकाचे राजहंस प्रकाशन,पुणे या संस्थेद्वारे प्रकाशन करण्यात येणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. ना. श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,मा. ना. श्री. अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. सदानंद मोरे, प्रख्यात साहित्यीक व माजी साहित्य संमेलन अध्यक्ष तसेच स्वतः डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह या पुस्तकाचे शब्दांकन करणाऱ्या श्रीमती करुणा गोखले, सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास सामाजिक व राजकिय क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी यांना निमंत्रित केले आहे. कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असणार आहे. तसेच निमंत्रितांनी ४.३० वा संस्थापन्न व्हायचे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.