डॉ सुभाष भावे लिखित श्री हनुमान चालीसा विवेचनात्मक विचार या मराठी पुस्तकाचे डॉ धनंजय केसकर यांनी इंग्रजीत भाषांतर केले- “Shri Hanuman Chalisa A Deliberation”प्रकाशक इंडस सोर्स बुक्स. तसेच मेरी बफे व डेव्हिड क्लार्क यांच्या द डाओ ऑफ वॉरेन बफे या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले – “ वॉरन बफे यांचे गुंतवणूक सिद्धांत”प्रकाशक मंजुळ प्रकाशन. या नवीन भाषांतरीत पुस्तकांचे प्रकाशन डॉ.गिरीश बापट डॉ.सुधीर राशिंगकर यांच्या हस्ते करण्यात आले. रुईया मुकबधीर विद्यालय यातही सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी इंडस प्रकाशनाच्या सोनवी देसाई आणि मंजुळ प्रकाशनच्या मेधा कुलकर्णी आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना अनुवादक डॉ.धनंजय केसकर यांनी हनुमान चालीसा हिंदूंच्या भक्तीचा विषय आहे. हिंदू जगभरात विविध देशात ही आहेत त्यामुळे या पुस्तकाला सर्वत्र प्रतिसाद मिळेल असे सांगितले. डॉ.गिरीश बापट यांनी बोलतांना डॉ धनंजय केसकर यांनी या दोन्ही पुस्तकांचा अनुवाद अत्यंत रसाळपणे.केल्याचे सांगितले, हनुमानाची बुद्धिमत्ता शक्ती आणि युक्ती यासर्वांबद्दल त्यांनी स्पष्ट केले.हनुमान चालीसा हा अध्यात्मिक तर वॉरन बाफे हा लौकिक विषय असताना दोघानाही न्याय दिल्याचे प्रतिपादन केले.सुधीर राशिंगकर यांनी बोलतांना पाश्चात्य देशात पाल्य किशोर वयात आले की आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र केले जातात, ते स्वतः कमवतात. आपल्या देशात ही अशी पद्धत आली तर आपल्या देशात ही वॉरेन बफेट निर्माण होतील असे प्रतिपादन केले. डॉ.साजिरी जोशी यांनी गणेश वंदना सदर केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.अश्विनी सोवनी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.उमेश केसकर यांनी केले. “Shri Hanuman Chalisa A Deliberation” पुस्तकाची पाने १७० असून किंमत २७५/- आहे. “ वॉरन बफे यांचे गुंतवणूक सिद्धांत” पुस्तकाची पाने १८० असून किंमत २९९/- आहे. छायाचित्र : डावीकडून डॉ.गिरीश बापट,डॉ.सुधीर राशिंगकर,डॉ.धनंजय केसकर,डॉ.सुभाष भावे.