मुंबई/पुणे दि.०६ : भारतरत्न, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी आंबेडकर विचारांच्या व त्यांच्या तत्त्वावर चालणाऱ्या वाचनालय यांना १० लक्ष रु निधी जाहीर केला आहे. याबाबत उपसभापती कार्यालय येथे संपर्क करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
यावेळी विधिमंडळाचे उपसचिव विलास आठवले, राजेश तारवी उपसभापती कार्यालयाचे सचिव रविंद्र खेबुडकर, सचिन चिखलकर उपस्थित होते.